मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Friday, August 27, 2021

|| तथास्तु ||

 

जगांतल्या साडेतीन शक्तिपीठांपैकीं करवीर नगरीत

प्रकटलेलं आदिमाया- आदिशक्ति चं हे ऊग्र रूप.


' महालक्ष्मी ' असंही तिचं एक संबोधन प्रचलित

असल्यानं या मातोश्रींच्या महाद्वारीं, पैसा-अडका, पोरं-

बाळं, दागदागिने, गाड्या-घोडे, पदोन्नत्या-पगारवाढी,

इत्यादि इत्यादि तमाम ऐहिक सुखोपभोगांसाठी सांकडं

घालायला, नवस बोलायला आलेल्या भाविकांची उदंड

रीघ लागलेली नेहमीच बघायला मिळते...


आदिमायेच्या या ' रणचंडिका - महिषासुरमर्दिनी ' च्या

अवताराकडं, ही असली ऐहिक सुखं मागायला जाणं, हे

मला तरी, सैन्यदलांच्या शस्त्रास्त्र-दारुगोळा निर्मितीच्या

कारखान्यांत दागदागिने मागायला जाण्याइतकं वेडेपणाचं

वाटतं... 

 

कारण एकच असावं ...


|| महदादणुपर्यन्तं यदेतत्सचराचरम्

त्वयैवोत्पादितं भद्रे, त्वदधीनं इदं जगत्

 

त्वमेव सूक्ष्मा स्थूला त्वं व्यक्ताव्यक्तस्वरूपिणि

निराकारापि साकारा कस्त्वां वेदितुमर्हसि

 

उपासकानां कार्यार्थं श्रेयसे जगतामपि

दानवानां विनाशाय धत्से नानाविधास्तनु:

 

चतुर्भुजा त्वं द्विभुजा त्वं षड्भुजाSष्टभुजा तथा

त्वमेव विश्वरक्षार्थं नानाशस्त्रास्त्रधारिणि ||


असं ऋग्वेदात वर्णिलेल्या आदिमायेचं हे रूप नेमकं

कश्याचं द्योतक आहे, हें च धंडपणे समजलेलं नसणं.


गेलीं चाळीसएक वर्षं दररोज मातोश्रीं चा गायत्री करून जे

कांही परमाणुएव्हढंच मला समजलं,


तें येणेप्रमाणें... ... ...

 

," खात्री तुझ्या वरदहस्ताइतूकी

   

   आयुष्य जगतां, तुडवीत कांटे 


   माझ्याच श्वासोंछ्वासांप्रतीही


   अंबे, न मजला बिल्कूल वाटे "


जगदंब...जगदंब...


***************************************************************


-- रविशंकर.

२६ ऑगस्ट २०२१.

 

 

 

|| तथास्तु ||

                   



 
 

आहे विराजली गेहांत जगध्दात्री

रोज दोन वेळां, स्नानोत्तर गायत्री

करितां, अंबेच्या चरणीं टेंकुन माथा

मी विचारतो तिज, कुंठित होउन, आतां         || ||


," गे, बरी म्हणावी जळू , चिकटला ऐसा

आजन्म, मानवा, जन्मापासुन पैसा

ती गळून पडते, पूर्ण शोषुनी रक्त

पैश्याची मात्रा, हांव वाढवी फक्त !!                || ||


दृष्टी होते संकोचत, स्वार्थी-कोती

पैसा, विसराया लावी नातींगोतीं

तो खुळखुळतांची खिश्यांत, चंढतो माज

कालचा ससा, दावी गुरकावुन आज !!          || ||


धन-संपत्ति हे तुझेच कां गे रूप ?

ते ची पुजणारे, भाविक बघतो खूप

त्रैकोक्यधारिणी जी, ऐश्या तुजलाच

पाहतीं चारण्यां, नवस बोलुनी, लाच !!          || ||


जाहला चालता वनांत, नेसुन वल्कल

माणुसकीसंगे विवेक, आतां अक्कल

जाईल कधीही जगतातून उठून

मी, करूं काय , पैश्याची टाळ कुटून ?          || ||


रांग भाविकांची प्रचण्ड लागे दारीं

मागाया पैसा- अडका, मिन्नतवारी

देणा-या पद्मावती, नि कमलाबा

संपत्तीशी, तुज देणे - घेणे नाही !!                || ||


आरत्या-प्रसादांचे कां तुज अप्रूप ?

ऐश्वर्य मागती, हपापलेले भूप

जाणतीं न, महिषासुरमर्दिनि अवतार

दागिने मागण्यां, गांठति शस्त्रागार !!             || ||


जे ' शिराळशेठ ‘, न् ' शेख महंमद ' भक्त

गाड्या-घोड्यां साठी, आंटविती रक्त

मारण्यास येतीं तुझ्याच माथीं, भारां

दरबारीं तुझिया ' लाडोबा ' स न थारा !!     || ||


निपजलो न मी, गे तुझ्या कृपेने, ऐसा

भंजणारा, श्वासागणीक ,” पैसा- पैसा "

काल जो दोन पायांवर होता चालत

आज, चार पायांवरतीं चाले, डोलत !!          || ||


सोडिला न जन्मांतरीं जिने, भीष्माला

पत्करले नपूंसकत्व, पुनर्जन्माला

नी, रणांगणीं, ने हिशेब पूर्णत्वाला

त्या स्वत्त्वाची, तूं धंगधंगणारी ज्वाला !!      || १० ||


स्वामी ' नारायण ' तिरुपति स्थानीं वसले

संगे ' पद्मावति-कमला ' , जोडिस बसले

मनधंरणी करिती, साडि पांठवुन, आतां

विरघळली युगानुयुगे न, अंबा माता !!         || ११ ||


निष्पक्षपात ' ही तुझी त्रिलोकीं द्वाही

कर्माला दूषित, दया नि माया नाही

शुचितेचे अंतर्बाह्य, तुला लखमोल

निष्ठुर न्याय तराजूचा, ढंळे न तोल !!         || १२ ||


अपराध्याच्या, जर चंढे मस्तकीं तोरा

फोंडून काढिशी बेदम, आंचरट पोरां

बसतां रट्टा पांठीत, ओंकुनी गरळ

होतसे दैत्यही, सुतासारखा सरळ !!           || १३ ||


कायदा तुझा आसूडच, ऊग्र - कठोर

घेणे न कडेवर उचलुन, हट्टी पोर

रणभूमीवर, जखमा झेलीत घडावे

नी धर्मयुध्द, ज्याचे त्याने च लढावे !!        || १४ ||

 

भक्तांना देशिल, अमोघ अस्त्रे-शस्त्रे

कर्तृत्त्व - पराक्रम रणांगणींचा, भद्रे

व्यक्तिमत्त्व कणखर-भेंदक - बाणेदार

वाणीस, तंळपत्या तलवारीची धार !!         || १५ ||


चारित्र्य शुध्द , अन् प्रखर आत्मसन्मान

हीं कवच-कुण्डलें, केली तूं च प्रदान

जगण्याची, लढतो माझी मी च लढाई

कसलीच, अजवरी ददात पडली नाही !!    || १६ ||


चंरचंरीत पांजळुनी, स्वत्त्वाची धार

ऐशी दिलीस, लखलखणारी तलवार

रोंजच्या कुरु़क्षेत्रीं, मी जाण्यां निघतां

की, भले भले लोळतील, बघतां बघतां !!    || १७ ||


मागणे न कांही तुजपाशी गे आतां

या तुझ्याच चरणीं पावन, टेंकुन माथा

सामर्थ्य तुझे, किंचितसे मजला लाहो

नी वरदहस्त मस्तकीं निरंतर राहो ”         || १८ ||


हांसते मन्द, ती जगन्मोहिनी माय

," मागतां न कांही, तुजला देऊं काय ?

ठेवितें मस्तकीं कर ' दीर्घायुषमस्तु '

जाणलेस मजला, इतके पुरे , तथास्तु “     || १९ ||




-- रविशंकर.

21 ऑगस्ट 2021.

No comments:

Post a Comment