॥ दंश ॥
( गझल )
दंश झाला वास्तवाचा, शीर्ष भंजाळून गेले
सोंसलें आघात जे मी, तें मला जाळून गेले !
घेतला होता वसा राजीखुषीनें, विस्तवाचा
अग्निदिव्याला परंतु, प्राण कंटाळून गेले !!
जेंवलो ताटांत एका, काल मी ज्यांच्यासवें, ते
आज भिक्षा वाढुनी, सन्मान हेंटाळून गेले !
केंस ज्यांचे रेशमी, माझा गळा कांपीत होते
धिंड माझी कांढतांना, तेच ओंवाळून गेले !!
जोंवरी मी गप्प होतो, घालुनी ओंठांस टांके
धूतवस्त्रें, धोंरणी परिचीत, डागाळून गेले !
फांडुनी बुरखे तयांचे, टांगली वेंशीस मी जीं
लक्तरें, वैरी पुन्हां, गंगेत खंगाळून गेले !!
षंढ लोकांना बघ्या, होता फुकटचा तो तमाशा
मानभावी सांत्वनाची, तें प्रथा पाळून गेले !
जाब कोंणाला विचारूं ? काढली माझीच साक्ष
वेंचता गाळून शब्द, अर्थ वंगाळून गेले !!
पोंसलेले रक्त-घामाचा सडा घांलून माझ्या
झाड तें, भांगेतल्या तुळशीपरी वांळून गेले !
राहिलीं फांद्यांवरी, नाही म्हणाया चार पाने
सान त्यांची सांवली, पांथस्थही टांळून गेले !!
कांढले नाही तरी मी, स्वत्त्व बाजारीं विकाया
सूज्ञ सौदेबाजही, माझ्यावरी भाळून गेले !
मांडतां लीलांव माझा, ऐकुनी पहिलीच बोंली,
काल जें तोंर्यात होंतें, आज ढेंपाळून गेले !!
संपले नव्हते परी, खिजवायला दुर्दैव माझें
बेंरकी दांभीक, माझें सुतकही पाळून गेले !
सोबतीने यातनांच्या, भोंगला वनवास तों मी
सत्यनिष्ठेचे पुकारे, आत्म प्रक्षाळून गेले !!
भक्ष्यवेड्या श्वापदांच्या, चालतां अंधारवाटा
पाय माझें वेंगळीची, वाट चोंखाळून गेले !
फुंकुनी कुरवाळतां, सलते जिव्हारीं खोल घांव
आंसवें माझ्यावरी आकाशही गाळून गेले !!
न्यायदानाला क्षतांच्या कांढता, खपल्या इरेने
वाहत्या रक्तामधे, इतिहास बंबाळून गेले !!
लावली जों चूड मी, विश्वासघाताच्या चितेला
मस्तकीं चंवर्या विजांच्या, मेघही ढांळून गेले !
बैसलों ठोंकून मांडी, श्राद्ध घांलाया तयांचें
तर्पणाला तीळ घेतां, पिंड ओंशाळून गेले !!
वेंचुनी सारे निखारे धुमसते, गाथा लिहाया
घेंतली मी लेखणी, अन् शब्द तेंजाळून गेले !!!
***********************
----- रविशंकर.
१ जानेवारी १९९९.