मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ॥ कोऽवयम्‌ ? अर्थात् ’आम्ही कोण ?’ ॥. Show all posts
Showing posts with label ॥ कोऽवयम्‌ ? अर्थात् ’आम्ही कोण ?’ ॥. Show all posts

Monday, December 8, 2008

॥ कोऽवयम्‌ ? अर्थात् ’आम्ही कोण ?’ ॥



(व्यंगोक्ति)

"कोण आम्ही? म्हणूनी काय पुसतां? मूर्ख बावळे !
पाहिले काय जन्मांत, पांढरे डोमकावळे?

दिल्या आम्हांस मेंढ्यांच्या, इंग्रजांनी जहागि-या
प्रजेच्या मस्तकीं, गेले बजावुन, वांटण्या मि-या !

आंधळ्या लोंकशाहीचा वसा, आम्हीच पेंलला
मतांचा जोगवा, कोंणी तांटवाटीत झेंलला?

उपाशी-बोंडके आम्ही, दया बापूंस पातली,
दिली त्यांनीच जी टोंपी, आम्ही रयतेंस घातली !!


शिराचा तारला त्यांनी प्रश्न, तों पोंट ओरडे
बुडाली पेशवाई कां, घांस खाऊन कोंरडे?

आम्हांला बोलले बापूं, ' सदा चरखा धरा शिरीं '
' चरा नी खा ' असा आम्हांस कळला अर्थ तत्परीं !


आमच्या बापजाद्यांना न पदव्या, फक्त अक्कल
' हपापाचा गपापा माल ' डाव्या हातचा मळ !!

तमाशा लावला आम्ही आगळा, संसदेतही
कळें कां फोंडली हण्डी कुणी, नी चांखलें दही?

घातलीं शुभ्र वस्त्रें कीं, गुन्हे होतात नाहिसें
करा पैसा गळें घोंटून, मोठे त्यांत कायसे?

अहिंसा पंचदशवर्षे, तुम्ही कां व्यर्थ सेंवली?
मुक्या बैलापरी जनता, आम्ही बडवून ठेंवली !!

बघा ही काढली टोंपी, ओंळखलात चेहरा?
न तुमचें काम तें, रस्ता घराचा, सत्वरीं धरा !

करा वाट्टेल तें, आमच्या उच्छेदास तोंडगे !
तुम्हांला पोंचवूं लेको !! आम्ही निर्ल्लज्ज कोंडगे !!!

*************************************

----- रविशंकर
१ सप्टेंबर २००२.