मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ॥ वायबार ॥. Show all posts
Showing posts with label ॥ वायबार ॥. Show all posts

Friday, November 20, 1998

॥ वायबार ॥



(गझल)

बेगडी तमाशे त्यांचे, जोरदार होते
वास फुलांचेही त्यांच्या, ऊग्र फार होते
गुलामिचा होता सारा, वस्त्रहीन नाच
ढोंलकी पिटाया, पक्के गुन्हेगार होते ! ॥१॥

टगे लाळघोंटे, गातीं आरती तयांची
भक्तिभाव लाचारीचे, बेसुमार होते
तुरे डोंलती ठेंक्यात, गुंगुन फेट्यांचे
नेत्र मात्र शागीर्दांचे, अंध ठार होते !! ॥२॥

लागल्या जश्या वाजाया, जुलुमाच्या झांजा
उदो-उदो कर्ते चोर, अब्रुदार होते
चमकलोंच कानीं पडतां, ध्वनी शृंखलांचा
टाळ्या पिटणारे हात, गिरफ़्तार होते !! ॥३॥

नाचले सगे कैफांत, अहमहमिकेने
तळतळाट बांधुन पायीं, जें विखार होते
वाहवा म्हणायालाही, घसा वांसवेना
घांव गारद्यांचे, इतके हळूवार होते !! ॥४॥

भाग्य उठुन गेंलें, त्यांच्या मैफलींमधून
रक्त राक्षसी तृष्णेला, थंडगार होते
घडा जरी कांठोंकांठ, होता भरलेला
खडे शंभराला बाकी, दोनचार होते !! ॥५॥

कत्तली तयांनी केंल्या, पाठबळें ज्यांच्या
सख्य लाडक्या सोद्यांचें, उसनवार होते
'बापसे सवाई बेटे', भेंटले गुरूला
प्राण द्यायच्या वेळीं, सारे पसार होते !! ॥६॥

फार त्यांस उशिरा आले, भान वास्तवाचे
पापकर्म तोंवर त्यांच्या, शिंरीं स्वार होते
जिवास देणार्‍या जीव, इनामी ठगांचें
गळा कापणारे केंस, धारदार होते !! ॥७॥

घमेंडीत घातक, त्यांनी लढविले शिखंडी
युद्ध तें, न खेंळावेसे, धुवॉंधार होते
दिले ज्यांस सन्मानानें, त्यांनी शिरपेंच
पाठीवर मानकर्‍यांचे त्याच, वार होते !! ॥८॥

ससे होंलपटले खातां, नियतिचे तडाखे
लढणे एकाकीं भाग, निराधार होते
छत्र-चामरे-अंबारी, कोंसळतां खाली
गायला पवाडे, फक्त दुराचार होते !! ॥९॥

घांतल्या फितुर चेंल्यांनीं, मनगटांत बेड्या
ललाटीं तयांच्या जगणे, भुईभार होते
चाखलीं फळें वृक्षाची विषाच्या, तरीही
जळत्या सुंभाचे पेड, पीळदार होते !! ॥१०॥

द्यायला उपाधी त्यांना, शब्द सुचेंनात
मी मी म्हणणारे भाट, गप्पगार होते
चितेवरी जळतांनाही, त्यांस आकळेना
मानवन्दनेसाठी कां, वायबार होते ? ॥११॥

*************
----- रविशंकर.

२० नोव्हेंबर १९९८