॥ आरक्षण ॥
(व्यंगोक्ति)
मतदाते आम्ही | तुमचें विचक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१॥
पांठ-पोंटांवरीं | नकां मारूं घण
द्यावें आरक्षण, | मायबापां ! ॥२॥
पदविचें असावें | फुकटांत औक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥३॥
नको पात्रतेचे | वृथा राजकारण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥४॥
राखीव चांकरी | कमाई विलक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥५॥
कुवतीचें कश्याला | हवें सर्वेक्षण?
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥६॥
पोटांसाठीं करूं | 'संप-बंद' दारूण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥७॥
जगूं कसे, पैसा | केंल्याविण भक्षण?
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥८॥
रोंडावले टक्के | धंद्याला ग्रहण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥९॥
जगण्यां करूं लागे | ग्राहकाचें शोषण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१०॥
बंद करा स्पर्धा | निकोप, परीक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥११॥
त्रासाच्या मुळाशीं | खुलें अर्थकारण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१२॥
करांचें, मुळीच | नको गळां लोढणं
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१३॥
करूं चोरीमारी | हत्त्याही निर्घृण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१४॥
झालीं साथिची या | तुम्हांसही लागण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१५॥
बघा, शेंत, खाई | तुमचेही कुंपण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१६॥
इंग्रजांनीं, नाही | दिलें, मोंकाटपण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१७॥
अतां व्हावें सात | पिढ्यांचें कल्याण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१८॥
नकां करूं पेंच | संसदेत निर्माण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१९॥
कुणाचें करावें | कुणी, आज ईक्षण?
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२०॥
चरायला हवें | राखीव कुरण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२१॥
आम्ही तुमचींच | लेंकुरें अजाण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२२॥
मतपेंटीचे झणी | उघडेल झांकण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२३॥
भल्यासाठीं तुमच्या | केले निरूपण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२४॥
'भिक्षांदेहि'चें च | उपजत शिक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२५॥
**************
----- रविशंकर
११ ऑक्टोबर २००७
(व्यंगोक्ति)
मतदाते आम्ही | तुमचें विचक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१॥
पांठ-पोंटांवरीं | नकां मारूं घण
द्यावें आरक्षण, | मायबापां ! ॥२॥
पदविचें असावें | फुकटांत औक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥३॥
नको पात्रतेचे | वृथा राजकारण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥४॥
राखीव चांकरी | कमाई विलक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥५॥
कुवतीचें कश्याला | हवें सर्वेक्षण?
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥६॥
पोटांसाठीं करूं | 'संप-बंद' दारूण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥७॥
जगूं कसे, पैसा | केंल्याविण भक्षण?
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥८॥
रोंडावले टक्के | धंद्याला ग्रहण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥९॥
जगण्यां करूं लागे | ग्राहकाचें शोषण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१०॥
बंद करा स्पर्धा | निकोप, परीक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥११॥
त्रासाच्या मुळाशीं | खुलें अर्थकारण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१२॥
करांचें, मुळीच | नको गळां लोढणं
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१३॥
करूं चोरीमारी | हत्त्याही निर्घृण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१४॥
झालीं साथिची या | तुम्हांसही लागण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१५॥
बघा, शेंत, खाई | तुमचेही कुंपण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१६॥
इंग्रजांनीं, नाही | दिलें, मोंकाटपण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१७॥
अतां व्हावें सात | पिढ्यांचें कल्याण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१८॥
नकां करूं पेंच | संसदेत निर्माण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥१९॥
कुणाचें करावें | कुणी, आज ईक्षण?
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२०॥
चरायला हवें | राखीव कुरण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२१॥
आम्ही तुमचींच | लेंकुरें अजाण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२२॥
मतपेंटीचे झणी | उघडेल झांकण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२३॥
भल्यासाठीं तुमच्या | केले निरूपण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२४॥
'भिक्षांदेहि'चें च | उपजत शिक्षण
द्यावें आरक्षण | मायबापां ! ॥२५॥
**************
----- रविशंकर
११ ऑक्टोबर २००७