॥ सायबर्-चॅट् ॥
(व्यंगोक्ति)
विनू ऊर्फ विनायक मोरेश्वर पेंडसें ---
पुण्यनगरी नामक ख्यातकीर्त शहरातल्या ६८९ (जुना) शनवार, असल्या कुठल्यातरी अस्सल्ल गाळीव पुणेरी पत्त्यावर राहणारा इसम. वडील मोरोपंत ऊर्फ अप्पा पेंडसे, गांधीवादी-खादीधारी-स्वातंत्र्यसैनिक-स्वदेशाभिमानी. एकदम सुसंस्कृत, ताठ आणि कडक.
विनोबा दोन खोल्यांच्या वाड्यातल्या घरांत वाढलेले. आयुष्यात कुणालाही चहादेखील न पाजलेले. सायकललाच गाडी म्हणणार्या शेंजारांत मुरलेले. अप्पांच्या पोंटी जन्मलेले , पण त्यांच्या वार्यालाही न थांबलेले.
असे हे विनोबा ग्रॅज्युएट् झाले, नी एक दिवस कसलासा कॉंप्युटरचा कोर्स आणि जी.आर्.ई. करून यू. एस्. वेड्यांच्या तांड्यांत सामील होत अमेरिकेस चालते झाले. डॉलरची नोट आणि यू.एस्. मधला थाटमाट बघून विनोबांचे डोंळे विस्फारले, आकाशाला हात टेंकले, आणि पाय जमिनीवरून कधी उचलेले गेले, तें त्यांचे त्यांनाच कळले नाही !
'इण्डिया' एकदम फालतू वाटायला लागला. विनोबांचा ’विकी’ झाला. अमेरिका स्वर्गवत् भासूं लागली.
आणि त्याच धुंदीत एकदिवस, त्यांना तीर्थरूप अप्पांशी सायबर्-चॅट् करायची दुर्बुद्धी झाली.
विनोबांनी ती. अप्पांशी कसं चॅट् केलं, आणि अप्पांनी विनोबांना 'फाट्' करून कसं जमिनीवर आणलं, त्याची ही चित्तरकथा...
******************************************************सायबर्-चॅट्.
http:\\www.viki@usa.com
ती. अप्पांस,
"कॉम्प्युटर नसेल तर, आंकडेमोड जमत नाही
' पेप्सी-कोक् ' शिवाय, साधी तहानसुद्धां शमत नाही ! '
' टाईट् स्लॅक्स्-जीन्स् ' खेरीज, दुसरा कपडा रुचत नाही
' हॉट् डॉग्-बर्गर ' सारखी, 'पोळी-भाजी' पचत नाही !!
'व्हॅलेंटाइन्' कोण होता?, तें कुणांस स्मरत नाही !
'रॉक्-पॉप्-रॅप् ' शिवाय, गाण्यांत दम उरत नाही !!
' स्टेप कट्-बॉब्-फ्लिक्स् ', हीच फॅशन खरी आहे.
' पिझ्झा आणि नूडल्स ' वर, ’स्टार्टर’ सुद्धां फ्री आहे !!
' पांचवारी-लेंगा-झब्बा ' शी! कसला वेष आहे !
' रगर् जीन्स्-रीबॉक् शूज् ', भारत माझा देश आहे !!
दहा-वीस हजारांत, वरखर्च भागत नाही
समाजाचं आम्ही कांही, देणं-घेणं लागत नाही !!
' देव-धर्म-पूजा-अर्चा? ' गॉड्! सगळा त्रास आहे !
' रामा-कृष्णा-वेदा ' यांना, इंपोर्टेड् चा सुवास आहे !!
परदेशी मालाचा दर्जा, स्वदेशीच्या छापांत नाही
'मॉम्-डॅड् ' मधलं कल्चर् , देशी ' आई-बापांत ' नाही !!
' गांधी टोंपी-खादी ', सारे पुढा-यांचे चोंचले आहेत
शिक्षण पुरं करतां-करतां, पंचवीस लाख मोजलें आहेत !!
बघाल तिथं खाबूगिरी, जाल तिथं रांग आहे !
सरकार म्हणजे, नागरिकांच्या नानाची टांग् आहे !!!
' इंडिया ' त ढोर मेहनत, ' फास्ट-बक् ' चा बाजा आहे !
' यू एस् ' मधला लुंगासुंगा, च़पराशीही राजा आहे !!
' सिलिकॉन् व्हॅलीत ' तर, श्वासांगणिक छदाम आहे !
' डॉलर ' जिथं नाही, तिथं थांबण्यात काय राम आहे ?
' नॅप्पी-कॅण्डी-कुकी ' शिवाय, इथली पोंरं वाढत नाहीत !
' स्लॅंग् लिंगो ' बोंलेपर्यंत, शाळा वर्ग सोंडत नाहीत !!
' एम्.बी.बी.एस्.' वाला,साधा डॉक्टर, इथं भेंटत नाही !
'आज्जीबाई' च्या बटव्यानं, सर्दीसुद्धां हटत नाही !!
' क्रेडिट् कार्ड ' खेरीज इथलं, पानसुद्धां हलत नाही !
चार-पांचशे मैल प्रवास, कधी केला, कळत नाही !!
' बर्म्युडा ' चढवली की, कुठं कांही अडत नाही !
' ग्रीन कार्ड ' मिळेंतोंवर, जीव भांड्यात पडत नाही !!
पाच दिवस डॉलर कमवा, दोन दिवस वीक्एण्ड् आहे
'लाईफ् एंजॉय् करून घ्या ' हा इथला ट्रेण्ड् आहे !
लाख-दीड लाख पगार, गाडी-घोडा, सगळं आहे !
' यू. एस्. ' मधलं 'पॉश् लाईफ़्', स्वर्गाइतकं वेगळं आहे !! "
लव्ह्
विकी
----------------------------------------------------------------
http:\\www.appa@india.com

चि. विनायकांस,
आम्ही साधे-सुधे पण, माणुसकीचा बाज आहे !
'आज-हायर्-उद्यां फायर् ', तुमच्याकडचा रिवाज आहे !!
' नेट्-सर्फिंग्-चॅट् ' खेरिज, तुमचा दिवस ढळत नाही
मातृभाषेमधलं बोलणं, वर्षभरांत कळत नाही !!
रिझॉर्ट्-क्लब-पार्ट्यात्नं, व्यायाम कांही घडत नाही !
' सॉना-बाथ-फ़ास्टिंग् ' करून, लठ्ठपणा झडत नाही !!
केंरवारे-स्वैपाकाला, तिकडं कमरा वांकत नाहीत !
'पस्तिशितलं म्हातारपण ', ब्यूटी पार्लर झांकत नाहीत !!
सरगांठीच्या विवाहांतच खूष, तिथली नार आहे !
घटस्फोंट घेतां-घेतां, दुसरा पाट तयार आहे !!
असल्य़ा गृहस्थाश्रमांस, आम्ही भीक घालीत नाही !
पांचवारीत ओंवाळणारा जीव, झगेंवालीत नाही !!
' आज चंगळ करून घ्या, उद्यां कुणांस दिसला आहे ? '
कानमंत्र हाच, तुमच्या उरीं-शिरीं ठंसला आहे !!
' गाड्या-घोंडे-बंगला ' सारा, थाट छानच जमला आहे ! '
तुमच्या गुलामगिरीवरच, साहेबाचा इमला आहे !!
' हाय्-फाय्-सोसायटी ' ची, तिथं चंगळ अमाप आहे !
' काळे-गोरे ' भेंदाबद्दल घृणा वाटणं, पाप आहे !!
' तसला आवाज ' काढायला, तुमची जीभ रेंटत नाही !
' आय्-सी-यू ', पडलांत तर, शेंजारीही भेंटत नाही !!
कन्या, इकडं धाडायचा, हुकूम घरांत सुटला असेल !
' बेटिंग-डेटिंग ' तिथलं बघून, पोंटांत गोळा उठला असेल !!
' फाईन् ब्लेण्ड् ' असला तरी, 'स्कॉच्' इथं उपरी आहे !
तरण्यातांठ्या लेंकीसाठी, ' पुण्यनगरी 'च बरी आहे !!!
हवं तेव्हां या, इथं कामवाली बाई आहे.
पोरं सांभाळायला, तुझी धट्टीकट्टी आई आहे !!
मन:शांतीसाठी मार्ग, पूर्वेकडंच अमाप आहेत !
' यू. एस्. वादी ' पोरांनाही, विचारणारे बाप आहेत !!!
' ऋण काढून सण करा ' तत्वज्ञान आपलं आहे ?
' गांधी टोंपी-खादीनं ' च, आमचं स्वत्व जपलं आहे !!
डॉलरच्या गादित लोंळून, साहेब मात्र चळला आहे !
' रामा-कृष्णा-वेंदा ' म्हणत, पूर्वेकडंच वळला आहे !!
साहेबाची खरी जाण, अजून तुम्हांस झाली नाही ! '
विसरूं नकां ' त्रिशंकूं ' ना, जगांत कुणी वाली नाही !!
विठ्ठलाच्या मूर्तीपेक्षा, अधिक तांठ बडवा असतो !
जातिवंत परक्यांपेक्षा, 'फितुर' ज्यास्त कडवा असतो !!!
तात्पर्य: रट्टा बसायच्या आधीच शुद्धीत याल तर बरें !
तुझे,
अप्पा
******************
----- रविशंकर.
२८ जून २००१.