मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Saturday, December 13, 2008

॥ जे ॥

॥ जे ॥




(मूळ विचार: आर्य चाणक्य)

जे,

स्वार्थलोलुपता
सोडूं शकत नाहीत

अनीतीशी नाते
तोडूं शकत नाहीत

न्याय-स्वत्व
जाणूं शकत नाहीत

समूहाशी बांधिलकी
मानूं शकत नाहीत

आप्पलपोंटेपणा
टाकूं शकत नाहीत

अन्तरींचा आवाज
ऐकूं शकत नाहीत

किमान सात्विकता
पाळूं शकत नाहीत

कोहळ्याचा मोह
टाळूं शकत नाहीत

सत्यावर निष्ठा
ठेवूं शकत नाहीत

स्वतःपलीकडे
पाहूं शकत नाहीत

प्रांजळ सत्य
बोलूं शकत नाहीत

बरे-वाईट
तोलूं शकत नाहीत

सत्यापलाप
खोडूं शकत नाहीत

जुलुमाविरुद्ध
लढूं शकत नाहीत

फिर्यादीची दाद
मागूं शकत नाहीत

दिवास्वप्नांतून
जागूं शकत नाहीत

ऐश्या नरांचा
वा-नर समूहाचा
उत्कर्ष दूरच !

केंवळ पुनरुत्थानही
सर्वथा अशक्य असते !!

*********
---- रविशंकर
२० एप्रिल १९९९

No comments:

Post a Comment