मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ऋणी. Show all posts
Showing posts with label ऋणी. Show all posts

Saturday, December 13, 2008

॥ ऋणी ॥



(गझल)

अंगणांत दुर्दैव,उभे ठांकलेच होते
नियतीनें फांसे उलटे, टांकलेच होते
करीनात खंडन ओंठ, शिवण घातलेले
पुढ्यांत अकृतकर्माचे, दाखलेच होते !! ॥१॥

सुनावताना, त्या माझ्या गुन्ह्याचा निवाडा
तोंड रामशास्त्र्यांनीही, झांकलेच होते !
निकालावरी करणारे, सह्या वळणदार
हात, सोंवळ्या रक्ताने, माखलेच होते !! ॥२॥

तरळलेच पाणी नयनीं, दाट ओंळखीच्या
इमान घाताशी, ज्यांनी रांखलेच होते !
करूं काय दाखल करुनी, याचना दयेची ?
हलाहल हरायाचे, मी चांखलेच होते !! ॥३॥

तळपतां स्मिताची रेषा,मुखीं तृप्त माझ्या
मांग, चढवितांना फांशी, वांकलेच होते !
एव्हढ्याचसाठी झालो, ऋणी मी यमाचा
किरण, सूर्य बुडतांनाही, फांकलेच होते !! ॥४॥

*********************************
----- रविशंकर.
३१ ऑगस्ट २००७