॥ कोडं ॥
कोण शहाणा सांगून गेलाय्
’यथा राजा तथा प्रजा’ ?
माझ्या देशी, उलटी गंगा
’यथा प्रजा तथा राजा’ ! ॥ १ ॥
इथल्या सार्या लोकांची
’शाही’ जगावेगळी आहे
रामराज्य हांकायला
मवाल्यांची टोळी आहे ! ॥ २ ॥
अनुदानांसाठी, आम्ही
पसरलेली झोंळी आहे
त्यांच्याकडं आरक्षणांची
वेदनाशामक गोळी आहे ! ॥ ३ ॥
’आम आदमी’ च्या टाळूवर
तुपाटलेली पोळी आहे
एकगट्ठा मतांसाठी
मोफत साडी-चोळी आहे ! ॥ ४ ॥
ढोल-ताशे-मिरवणुकांत
प्रजा मश्गूल आहे
रुपयाच्या ’र’ ची
दाण्डीसुद्धां गुल् आहे ! ॥ ५ ॥
अर्थशास्त्री, फेटा बांधून
’ओम् शांति’ म्हणत आहेत
भर पावसातसुद्धा, लोक
पाण्यासाठी कण्हत आहेत ॥ ६ ॥
जाती-पाती ची मुळं
इथं खोंल रुजली आहेत
’ट्वेंटी-ट्वेंटी’ पायीं, मतं
चाळीस टक्के, कुजली आहेत ! ॥ ७ ॥
संप-मोर्चे-दंगेधोपे
इथं सगळं मस्त आहे
जगणं खूप महागलंय्
मरण बाकी स्वस्त आहे ! ॥ ८ ॥
बिनलायकीच्या पैश्याला
बेदम बाळसं चढलं आहे
रामराज्याविणा, इथं
कुठं काय अडलं आहे ? ॥ ९ ॥
कावर्याबावर्या जगण्याचा
पोंटांत सदा गोळा आहे
तिजोरीच्या अजीर्णावर
’सी.बी.आय्’ चा डोळा आहे ! ॥ १० ॥
ताट आणि वाटी एव्हढीच
आमच्या मतास किंमत आहे
’मी ही अण्णा’, म्हणायची
इथं कुणात हिम्मत आहे ? ॥ ११ ॥
आमच्या ’देशभक्ती’ चा
जगभर गंवगंवा आहे
शेंजारघरात ’भगतसिंग’
प्रत्येकालाच हवा आहे ! ॥ १२ ॥
रोजरोज गिळून, भूक
कांहीकेल्या शमत नाही
स्वतःलाही टोपी घालून
’अण्णा’ व्हायला जमत नाही ! ॥ १३ ॥
अंगातला मोकाटपणा
कळतोय्, पण वळत नाही !
साठ वर्षं आपटली, पण
’शुद्ध गांधी’ मिळत नाही !! ॥ १४ ॥
’दादा-भाऊ-बाबू’, काय
मंगळावरून आले आहेत ?
लोकपालासाठी, इथं
कोण आतुर झाले आहेत ? ॥ १५ ॥
असा राजा अशी प्रजा
त्रिलोकांत झाली नाही
आमच्या कर्तबगारीला
कुणीच कसा वाली नाही ? ॥ १६ ॥
बक्कळ पैसा आहे, तरी
जगणं कां नरक आहे ?
स्वातंत्र्य नी मोकाटपणांत
एव्हढा मोठ्ठा फरक आहे ? ॥ १७ ॥
माझ्या ’महान’ भारताची
तसलीच ’महान’ मजा आहे
’तैमूरलंगी’ सरकार, अन्
’शेख महंमद’ प्रजा आहे !!! ॥ १८ ॥
आमचं कसं काय होणार ?
परमेश्वरा, तुलाच माहीत
गल्लोगल्लीं ’खाबू-बाबू’
’बापू’ कुठंच दिसत नाहीत !! ॥ १९ ॥
भ्रष्टाचार-बलात्कार
इथं काय नवे आहेत ?
मला कोडं सुटत नाही....
’अण्णा’ कुणास हवे आहेत ? ॥ २० ॥
*********************
----- रविशंकर
२१ ऑगस्ट २०१३.
कोण शहाणा सांगून गेलाय्
’यथा राजा तथा प्रजा’ ?
माझ्या देशी, उलटी गंगा
’यथा प्रजा तथा राजा’ ! ॥ १ ॥
इथल्या सार्या लोकांची
’शाही’ जगावेगळी आहे
रामराज्य हांकायला
मवाल्यांची टोळी आहे ! ॥ २ ॥
अनुदानांसाठी, आम्ही
पसरलेली झोंळी आहे
त्यांच्याकडं आरक्षणांची
वेदनाशामक गोळी आहे ! ॥ ३ ॥
’आम आदमी’ च्या टाळूवर
तुपाटलेली पोळी आहे
एकगट्ठा मतांसाठी
मोफत साडी-चोळी आहे ! ॥ ४ ॥
ढोल-ताशे-मिरवणुकांत
प्रजा मश्गूल आहे
रुपयाच्या ’र’ ची
दाण्डीसुद्धां गुल् आहे ! ॥ ५ ॥
अर्थशास्त्री, फेटा बांधून
’ओम् शांति’ म्हणत आहेत
भर पावसातसुद्धा, लोक
पाण्यासाठी कण्हत आहेत ॥ ६ ॥
जाती-पाती ची मुळं
इथं खोंल रुजली आहेत
’ट्वेंटी-ट्वेंटी’ पायीं, मतं
चाळीस टक्के, कुजली आहेत ! ॥ ७ ॥
संप-मोर्चे-दंगेधोपे
इथं सगळं मस्त आहे
जगणं खूप महागलंय्
मरण बाकी स्वस्त आहे ! ॥ ८ ॥
बिनलायकीच्या पैश्याला
बेदम बाळसं चढलं आहे
रामराज्याविणा, इथं
कुठं काय अडलं आहे ? ॥ ९ ॥
कावर्याबावर्या जगण्याचा
पोंटांत सदा गोळा आहे
तिजोरीच्या अजीर्णावर
’सी.बी.आय्’ चा डोळा आहे ! ॥ १० ॥
ताट आणि वाटी एव्हढीच
आमच्या मतास किंमत आहे
’मी ही अण्णा’, म्हणायची
इथं कुणात हिम्मत आहे ? ॥ ११ ॥
आमच्या ’देशभक्ती’ चा
जगभर गंवगंवा आहे
शेंजारघरात ’भगतसिंग’
प्रत्येकालाच हवा आहे ! ॥ १२ ॥
रोजरोज गिळून, भूक
कांहीकेल्या शमत नाही
स्वतःलाही टोपी घालून
’अण्णा’ व्हायला जमत नाही ! ॥ १३ ॥
अंगातला मोकाटपणा
कळतोय्, पण वळत नाही !
साठ वर्षं आपटली, पण
’शुद्ध गांधी’ मिळत नाही !! ॥ १४ ॥
’दादा-भाऊ-बाबू’, काय
मंगळावरून आले आहेत ?
लोकपालासाठी, इथं
कोण आतुर झाले आहेत ? ॥ १५ ॥
असा राजा अशी प्रजा
त्रिलोकांत झाली नाही
आमच्या कर्तबगारीला
कुणीच कसा वाली नाही ? ॥ १६ ॥
बक्कळ पैसा आहे, तरी
जगणं कां नरक आहे ?
स्वातंत्र्य नी मोकाटपणांत
एव्हढा मोठ्ठा फरक आहे ? ॥ १७ ॥
माझ्या ’महान’ भारताची
तसलीच ’महान’ मजा आहे
’तैमूरलंगी’ सरकार, अन्
’शेख महंमद’ प्रजा आहे !!! ॥ १८ ॥
आमचं कसं काय होणार ?
परमेश्वरा, तुलाच माहीत
गल्लोगल्लीं ’खाबू-बाबू’
’बापू’ कुठंच दिसत नाहीत !! ॥ १९ ॥
भ्रष्टाचार-बलात्कार
इथं काय नवे आहेत ?
मला कोडं सुटत नाही....
’अण्णा’ कुणास हवे आहेत ? ॥ २० ॥
*********************
----- रविशंकर
२१ ऑगस्ट २०१३.