मित्रहो,
खालील कविता
संचेती इस्पितळाच्या
अपघातग्रस्त विभागांत
माझ्या शल्यविशारद मित्रासोंबत फिरतांना
मोडक्या-तुटक्या ’विशी पंचविशी’ च्या आईबापांच्या
भकास डोंळ्यांत बघत बघत रचलेली आहे... ... ...
एकजात सगळे डोंळे
मला थिजून विचारत होते... ... ...
"हे असं च चालायचं... ... ...!!!
सांगा काय करायचं?"
ह्या प्रश्नाचा हा लेखाजोखा
माझ्यावर प्रेम करणार्या ’विशी-पंचविशी’ साठी... ... ...
’काय करायचं???’
-- रविशंकर.
२२ मे २०१४.
******************************
॥ काय करायचं ? ॥
पुतणे-पुतण्या उवाच:
कश्यासाठी करायचं?
कुणासाठी करायचं?
आम्ही च कां करायचं?
कां म्हणून करायचं?
तुम्हाला काय करायचं?
आम्हांला हें च करायचं... ...
घरांत गुरगुरायचं
बाहेर फुरफुरायचं
’पल्सर’ आणि ’ स्कूटी पेप्’
आडव्या घालत फिरायचं !!
मॉल्स् मध्ये फिरायचं
मल्टिप्लेक्स ला ठंरायचं
’मॅक् डी’त च शिरायचं
वचां वचां चंरायचं !!
’ऍश्’ वर च मरायचं
’सल्लू’ साठी च झुरायचं
क्रेडिट कार्ड फडकवून
बेदम कर्ज करायचं !!
येन केन प्रकारेण
’आय. टी.’ त च शिरायचं
’सॉफ्ट्वेअर वाले’ म्हणून
ढोल पिटत फिरायचं !!
’स्लॅंग् इंग्लिश’ वापरायचं
जातां येतां डाफरायचं !!
’बी. पी. ओ.’ त फंरपटायचं
लळत लोंबत परतायचं !!
’रॅग्ज् जीन्स्’ नी सजायचं !!
’ट्वेण्टी-ट्वेण्टी’ त भिजायचं
’हुक्का पार्टी’ त नाचायचं
कश्यासाठी वाचायचं? !!
’नेट-सर्च’ मारण्यांतच
पुरतं डोकं चेंचायचं !!
शेंजार्याला टारण्यांतच
सगळं बळ वेंचायचं !!
’तिकडं’ जे जे चाललंय्
तें च ’इकडं’ थाटायचं
स्वतःचे च फोटो छापून
’फेसबुक्’ गिरगटायचं !!
आम्हांला हे च करायचं
तुम्हांला काय करायचं?
काका-काकू उवाच:
करताय् तसंच च भंरायचंय्
एव्हढंच ध्यानीं धंरायचं !!
’भरणं’ झेंपणार नसेल तर
कश्याला ’हे’ करायचं?
पश्चिमेला उमगतंय्
पूर्वेकडं च सरायचं
इथं वेड, दण्ड-माण्ड्या
उघड्या दाखवत फिरायचं !!
मीपणा ला कुरवाळत
लग्न च नाही करायचं !!
चुकुन माकुन केलंच तर
लचाण्ड निस्तरायचं !!
दुधानं तोंड भाजलं की
ताक पण फुंकरायचं
लग्नानंतर करतात ते
लग्नाशिवाय करायचं !!
इतकं सगळं केलंत तरी
पोट नाहिच भंरायचं !!
पुन्हां तो च यक्षप्रश्न
आतां काय करायचं?
मानसोपचारतज्ञाला
पैसा फेंकून धंरायचं !!
त्याला जमणार नाही तें
सांगतो, काय करायचं !!
सगळे हे च करताय्त म्हणून
आपणही कां करायचं?
जगावेंगळं कांहीतरी
कां नाही करायचं?
चेण्डूफळी उचललीत, की
’सीमापार’ च करायचं !!
एक आवाज काढलात की
’गप्पगार’ च करायचं !!
शड्डू ठोंकलात की
’चीतपट’ च करायचं !!
तलवार उपसलीत की
’पानिपत’ च करायचं !!
स्वत्त्वाच्या परीक्षेत
’आरपार’ च करायचं !!
जीव जडला की, सगळं
’धुवॉंधार’ च करायचं !!
वितण्डवादी भेंटला की
कंचाट्यात च धंरायचं !!
चलाख साळसूदपणाला
भुईसपाट च करायचं !!
फक्कड पोरगी पटली की
थेट लग्न च करायचं !!
शहाजोग भेंटला की
सरळ नग्न च करायचं !!
लेंखणी उचललीत की
’ढंळढंळीत’ च सादरायचं !!
वस्तरा पाजळलात की
’तुळतुळीत’ च भादरायचं !!
एकदां रेंटा लावलात कीं
तारूं ठाम तंरवायचं !!
सोटा उगारलात की
भूत सुद्धा उतरवायचं !!
तानपुरा लावलात की
’संमोहित’ च करायचं !!
गायला आ केलात की
आसमंत भारायचं !!
हे सगळं बाबांनों
स्वतःसाठीच करायचं !!
यथाशक्ति दुसर्यांच्याही
’झोंळी-ओंजळी’ त भंरायचं !!
काय काय स्वीकारायचं?
काय काय नाकारायचं?
एकदां विचार करून ठंरवा
काय काय पत्करायचं?
ठाम निश्चय केलात की
कळेल ’काय करायचं’ !!
केल्यावरच कळेल, कसं
मेल्यानंतर उरायचं? !!!
*************************
-- रविशंकर
२१ मे २०१४.
खालील कविता
संचेती इस्पितळाच्या
अपघातग्रस्त विभागांत
माझ्या शल्यविशारद मित्रासोंबत फिरतांना
मोडक्या-तुटक्या ’विशी पंचविशी’ च्या आईबापांच्या
भकास डोंळ्यांत बघत बघत रचलेली आहे... ... ...
एकजात सगळे डोंळे
मला थिजून विचारत होते... ... ...
"हे असं च चालायचं... ... ...!!!
सांगा काय करायचं?"
ह्या प्रश्नाचा हा लेखाजोखा
माझ्यावर प्रेम करणार्या ’विशी-पंचविशी’ साठी... ... ...
’काय करायचं???’
-- रविशंकर.
२२ मे २०१४.
******************************
॥ काय करायचं ? ॥
कश्यासाठी करायचं?
कुणासाठी करायचं?
आम्ही च कां करायचं?
कां म्हणून करायचं?
तुम्हाला काय करायचं?
आम्हांला हें च करायचं... ...
घरांत गुरगुरायचं
बाहेर फुरफुरायचं
’पल्सर’ आणि ’ स्कूटी पेप्’
आडव्या घालत फिरायचं !!
मॉल्स् मध्ये फिरायचं
मल्टिप्लेक्स ला ठंरायचं
’मॅक् डी’त च शिरायचं
वचां वचां चंरायचं !!
’ऍश्’ वर च मरायचं
’सल्लू’ साठी च झुरायचं
क्रेडिट कार्ड फडकवून
बेदम कर्ज करायचं !!
येन केन प्रकारेण
’आय. टी.’ त च शिरायचं
’सॉफ्ट्वेअर वाले’ म्हणून
ढोल पिटत फिरायचं !!
’स्लॅंग् इंग्लिश’ वापरायचं
जातां येतां डाफरायचं !!
’बी. पी. ओ.’ त फंरपटायचं
लळत लोंबत परतायचं !!
’रॅग्ज् जीन्स्’ नी सजायचं !!
’ट्वेण्टी-ट्वेण्टी’ त भिजायचं
’हुक्का पार्टी’ त नाचायचं
कश्यासाठी वाचायचं? !!
’नेट-सर्च’ मारण्यांतच
पुरतं डोकं चेंचायचं !!
शेंजार्याला टारण्यांतच
सगळं बळ वेंचायचं !!
’तिकडं’ जे जे चाललंय्
तें च ’इकडं’ थाटायचं
स्वतःचे च फोटो छापून
’फेसबुक्’ गिरगटायचं !!
आम्हांला हे च करायचं
तुम्हांला काय करायचं?
काका-काकू उवाच:
करताय् तसंच च भंरायचंय्
एव्हढंच ध्यानीं धंरायचं !!
’भरणं’ झेंपणार नसेल तर
कश्याला ’हे’ करायचं?
पश्चिमेला उमगतंय्
पूर्वेकडं च सरायचं
इथं वेड, दण्ड-माण्ड्या
उघड्या दाखवत फिरायचं !!
मीपणा ला कुरवाळत
लग्न च नाही करायचं !!
चुकुन माकुन केलंच तर
लचाण्ड निस्तरायचं !!
दुधानं तोंड भाजलं की
ताक पण फुंकरायचं
लग्नानंतर करतात ते
लग्नाशिवाय करायचं !!
इतकं सगळं केलंत तरी
पोट नाहिच भंरायचं !!
पुन्हां तो च यक्षप्रश्न
आतां काय करायचं?
मानसोपचारतज्ञाला
पैसा फेंकून धंरायचं !!
त्याला जमणार नाही तें
सांगतो, काय करायचं !!
सगळे हे च करताय्त म्हणून
आपणही कां करायचं?
जगावेंगळं कांहीतरी
कां नाही करायचं?
चेण्डूफळी उचललीत, की
’सीमापार’ च करायचं !!
एक आवाज काढलात की
’गप्पगार’ च करायचं !!
शड्डू ठोंकलात की
’चीतपट’ च करायचं !!
तलवार उपसलीत की
’पानिपत’ च करायचं !!
स्वत्त्वाच्या परीक्षेत
’आरपार’ च करायचं !!
जीव जडला की, सगळं
’धुवॉंधार’ च करायचं !!
वितण्डवादी भेंटला की
कंचाट्यात च धंरायचं !!
चलाख साळसूदपणाला
भुईसपाट च करायचं !!
फक्कड पोरगी पटली की
थेट लग्न च करायचं !!
शहाजोग भेंटला की
सरळ नग्न च करायचं !!
लेंखणी उचललीत की
’ढंळढंळीत’ च सादरायचं !!
वस्तरा पाजळलात की
’तुळतुळीत’ च भादरायचं !!
एकदां रेंटा लावलात कीं
तारूं ठाम तंरवायचं !!
सोटा उगारलात की
भूत सुद्धा उतरवायचं !!
तानपुरा लावलात की
’संमोहित’ च करायचं !!
गायला आ केलात की
आसमंत भारायचं !!
हे सगळं बाबांनों
स्वतःसाठीच करायचं !!
यथाशक्ति दुसर्यांच्याही
’झोंळी-ओंजळी’ त भंरायचं !!
काय काय स्वीकारायचं?
काय काय नाकारायचं?
एकदां विचार करून ठंरवा
काय काय पत्करायचं?
ठाम निश्चय केलात की
कळेल ’काय करायचं’ !!
केल्यावरच कळेल, कसं
मेल्यानंतर उरायचं? !!!
*************************
-- रविशंकर
२१ मे २०१४.