मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ॥ जीवन म्हणजे नाटक ॥. Show all posts
Showing posts with label ॥ जीवन म्हणजे नाटक ॥. Show all posts

Tuesday, June 2, 2015

॥ जीवन म्हणजे नाटक ॥

॥ जीवन म्हणजे नाटक ॥




नाटक बनवितात दिग्दर्शक व नाटककार
भूमिका मंचावर साकारतात कलाकार

कलाकार खरोखर आपण आपले असतात
वेशभूषा करून मात्र वेगळे दिसतात 

हावभाव असतात प्रसंग भूमिकेनुरूप
कदापि न विसरता आपले खरे स्वरूप

एक रोमांचक नाट्यमंच आहे ही सृष्टी
आपण सारे अभिनयपटु नट वा नटी

नाटककार व दिग्दर्शक परमेश्वर करविता
आपण उगाच समजतो स्वत:लाच कर्ता

’मी मंचावरील जे पात्र’ तेवढेच ज्ञात
नाटकाबाहेरील खरा ’मी’ मात्र अज्ञात

**********************************************

- किशोर कुलकर्णी
२७ मे, २०१५