मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Saturday, December 13, 2008

॥ कन्यादान ॥





नको मागे वळूं पोरी
पुढे संसार बोंलावी
जातां जातां मनीं कोंर
माझ्या ओंठातली ओंवी ॥१॥

काळजांत समाधान

स्थळ मिळाल्याचं, 'मस्त'
तरी काळजीनं होई
जीव व्याकुळ, अस्वस्थ ॥२॥

कन्यादान सार्थकांत

उदासीचा मनीं, कोंभ
डोंहीं अंतरीच्या, माया
सांकळली, थेंब थेंब ॥३॥

नीघ, आहेत पाठीशी

माहेराची, नातीगोती
खोळंबला पापणीत
माझ्या डोंळ्यातला मोती !! ॥४॥

**********
---- रविशंकर
१८ एप्रिल २००३.

No comments:

Post a Comment