मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Sunday, August 22, 2021

|| नॅनो राणी ||

 || नॅनो राणी ||

 

 



बांधणी सुबक-रेखीव, भेंकरावाणी

गर्दीत उमगते, जिच्या अंगिचें पाणी

थांबतीं जेथ अडकुनी दांडग्या गाड्या

डौलात धांवते माझी ' नॅनो राणी ‘ !!           || ||


इंधनात बाविस लीटर, भंरते पोंट

' चोवीस ' च्या सरासरीत, नाही खोंट

गाडीतळांवरीं झटपट, पुढतीं - मागे

फिरवून, मोकळ्या जागीं, चपखल लागे !!     || ||


डौलदार मस्तित, गजगामिनिची चाल

राष्ट्रीय महामार्गावर, करी कमाल

' बसलो हंसाच्या पाठीवर ‘, वाटावे

' शत लीटर ' मध्ये, ‘ लडाख ' ही गांठावे !! || ||

 

द्यावयास वर्दी पुढच्या गांवों गांवीं

' नॅनो राणी ' च्या आगमनाची, धांवी

' स्कोडा-होण्डा ' ओलांडुन जी स, सुसाट

तो-यात चालते ' नॅनो ', पांठोपांठ !!           || ||


न्याहाळतीं जिला टकमक, खेडोंपाडीं

भंर मंडईतही, वाट शोंधुनी काढी

पसरण्यां पाय चालकास, जागा मोठी

नी स्वयंचलित ' दातेचक्रांची पेटी ' !!         || ||


थंडीत गरम, गर्मीत होतसे थंड

इवलेसे इंजिन, ओंढी भार प्रचण्ड

चार माणसां, ऐसपैस बसण्यां जागा

आधुनीक सोयी ? काय हव्या त्या मागा !!   || ||


हे पिसासारखे हलके चालन चाक

आटोपशीर अपरे, दिलखेंचक नाक

पेटिका मावतिल दोन, ' डिकी ' चा ढांचा

नी स्वयंचलित हलतीं वरखालीं, कांचा !!     || ||


रेडिओ, अणी ब्ल्यू टूथ, रिमोट- कुलूप

मोबाइल वर दिग्दर्शी ' गूगल मॅप '

खास दिवे, दाट धुक्यांत, दावण्यां वाट

नी ' दुग्धवर्णि कोटा ' चा ' एथ्निक् थाट ' !! || ||


लागतां ' टोल ' चा, हमरस्त्यावर ' थांबा '

एस्. यू. व्ही. मालक ' करितीं ' तोबा तोबा '

रांगेत, होतसे ' स्कोडा ' केविलवाणी

टेंचात संटकते, सुळकन् ' नॅनो-राणी ' !!       || ||


माफक इंधन, ना देखभालिचा त्रास

भाग सुटे , मिळतीं टप-यांवर , हमखास

होतसे दुरुस्ती चुटकीसरशी, आणी

कुर्यात धांवते पुनश्च, ‘ नॅनो राणी ' !!            || १० ||


आला जर ' अदला बदली ' चा प्रस्ताव

मर्सिडीझ देतो ', म्हटला कोणी राव

सांगेन त्यास, “ लखलाभ तुझी तुज, ' बेणी '

मर्सिडीझ ' मजला, माझिच ' नॅनो राणी ' “ !!     || ११ ||



-- रविशंकर.

२१ ऑगस्ट 2021.




No comments:

Post a Comment