मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Thursday, April 16, 2020

|| तळीरामायण ||


त्रेतायुग आणि कलियुग या दोहोंत फरक काय असेल, तर तो इतकाच, की त्रेतायुगांत प्रभू राम जन्मले, तर कलियुगात तळीराम...!!

प्रभू रामचंद्राला रामायण रंचून महर्षी वाल्मिकी नी न्याय दिला. पण अलम दुनियेतल्या तळीरामांना कोण न्याय देणार ?

नाटककार राम गणेश गडकरी यांनी ' एकच प्याला ' लिहून तो यथातथ्य दिला खरा, पण जगभंरातल्या तळीरामांचं अफाट कर्तृत्त्व वर्णन करणारं अयन मात्र कुणीच लिहिलं नाही, ही त्यांची रास्त तक्रार आहे...

म्हणून हे ' तळीरामायण '...

-- रविशंकर.
*******************************************************************************

|| तळीरामायण ||
वृत्त: ओंवी


करोना जगाचा करी ' चक्का जाम '                   
धुंद तळीराम कासाविस                         ।।१।।

पडली घश्याला मरणाची कोंरड
होतसे तडफड जीवघेणी                        ।।२।।

फोंडली दुकाने केली लुटालूट
धंरी मानगूट सरकार                            ।।३।।

मिळे ना ' विलायती ' ' नारंगी-मोसंबी ' 
भंरी सज्जड तंबी अर्धांगिनी                      ।।४।।

घेऊं देईनात  आम्हांस विरक्ति 
करीत ' सुरा भक्ति ' मनोभावें   !!                  ।।५।।

सुचले कवणां युरोप-इटलीत 
 व्हावे ' बाटली ' त । स्थानबध्द   !!!               ।।६।।

अभेद्य ती भिंत । दारूच्या शिश्या ची
करोना विषाची ।  ऐशी-तैशी   !!                     ।।७।।

जातीच्या ' मद्यप्यां ' काय करी राम ? 
त्यांसी ' तळीराम ' हाच त्राता   !!!                ।।८।।
**************************************************
-- रविशंकर.
१६ एप्रिल २०२०

No comments:

Post a Comment