मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Monday, October 4, 2021

|| डॉलरवादी ||

 

 

 

 

 ," यू.एस.मॅन-आय.टी.यार
    चंगळबाजी अपरंपार
    फांटक्या जीन्स-विटके टॉप्स
    किंमत फक्त वीस हजार  " !!    ||१ ||

   'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
    वास्तव कधीच गिळत नाही
   
डॉलर उधळून 'बार' मिळतो
   'यार' विकत मिळत नाही  !!    ||२||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'बर्गर' मिळतं
    'भूक' विकत मिळत नाही  !!    ||३||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'पलंग' मिळतो
    'झोंप' विकत मिळत नाही !!    ||४||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'औषध' मिळतं
    'निरोगीपण' मिळत नाही  !!    ||५||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'कणसं' मिळतात
    'माणसं' विकत मिळत नाहीत  !!    ||६||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'पदव्या' मिळतात
    'द्न्यान' विकत मिळत नाही  !!    ||७||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'पोतीं' मिळतात
    'नातीं' विकत मिळत नाहीत  !!    ||८||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'कांति' मिळते
    'शांति' विकत मिळत नाही    !!    ||९||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'बायको' मिळते
     'गृहलक्ष्मी' मिळत नाही  !!    ||१०||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'चंगळ' मिळते
    'मंगल' कांहीच मिळत नाही  !!    ||११||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'व्हिला' मिळतो
    'घर' विकत मिळत नाही  !!    ||१२||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'वृध्दि' मिळते
    'समृध्दि' मिळत नाही  !!        ||१३||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'भोगणं' मिळतं
    'जगणं' विकत मिळत नाही  !!    ||१४||

     'यू.एस.मॅन-आय.टी. यार'
     वास्तव कधीच गिळत नाही
     डॉलर उधळून 'बक्कळ'मिळतं
    'अक्कल' विकत मिळत नाही  !!      ||१५||

    'यू.एस.मॅन-आय.टी. यार' ला
     एव्हढं च कधी कळत नाही
     डॉलर उधळून 'दाई' मिळते
     'आई' विकत मिळत नाही  !!!    ||१६||


********************************************************************

-- रविशंकर.
२ ऑक्टोबर २०२१. 

No comments:

Post a Comment