॥ पालखी ॥
आषाढांत बारावीची
निघे पालखी, पालखी
विद्यापीठांत शिराया
हवी चलाखी, चलाखी ! ॥१॥
सत्तरटक्के जहाल्या
जागा राखीव, राखीव
खर्या-खोट्या दाखल्यांचे
फुटे चोंहीकडे पेंव ! ॥२॥
थाटलीं शिकवण्यांचीं
ऐशी गुर्हाळे, गुर्हाळे
झाले असते पाहून
धन्य ज्ञानोबाचे डोळे ! ॥३॥
वारकरी तुम्ही-आम्ही
उक्त्या ज्ञानाचे, ज्ञानाचे
पोरें पुस्ताकांचे भारे
वाहतीं, मणामणाचे ! ॥४॥
मेंदूच्या अजीर्णांपायीं
भडभडून उलटी !
परीक्षेंत केल्यावर
कोरे डोके, कोरी पाटी !! ॥५॥
टाळांसंगे नाणियांच्या
वाजे नोटांचा मृदंग
भक्तिभावें आईबाप
झाले भजनांत दंग ॥६॥
गुणवत्तेसाठी चाले
मूक देंवाण-घेंवाण
पाठीमागील दाराला
नाही इच्छुकांची वाण !! ॥७॥
ऐनवेंळीं सराकार
काढी फतवा, फतवा !
वाढीव जागांचा तापे
पैसेवाल्यासाठीं तवा !! ॥८॥
जत्रेमाजी शारदेचा
भरे बाजार, बाजार
भाजून घ्यायला पोळी
संस्थाचालक तय्यार ! ॥९॥
उच्च न्यायालय मारी
प्रक्रियेस बूच, बूच
भर पावसात ठप्प
पालखीची आगेकूच !! ॥१०॥
हेवेदावें-आरोपांचा
उडे गोंधळ, गोंधळ
होळीआधी धूळवड
होते साजरी ओंगळ !! ॥११॥
न्याय-निवाडे होईतों
रंगे आखाडा रिंगण
स्वागताला 'श्री' च्या सज्ज
विद्यापीठांचे अंगण !! ॥१२॥
सर्वोच्च न्यायलयाचा
येतां निकाल, निकाल
पालखी हालें गजरीं
"हारी विठ्ठल विठ्ठल" !! ॥१३॥
दाटीवाटीच्या गाडीत
जागा मिळतां, मिळतां
कष्ट लागतीं सार्थकी
वाटे धन्य माय-तातां ! ॥१४॥
भक्तिरसांत लक्ष्मीच्या
बोला "श्रीरंग, श्रीरंग"
काय लावतील पाड
नामा-तुक्याचे अभंग? ॥१५॥
पोरा! गरीबां कुठलं
देव दर्शन, दर्शन?
लक्ष्मीसंगं गाभार्यात
नान्दतोय, नारायण !! ॥१६॥
पालखीला दर साली
गर्दी अफाट, अफाट !!
धनदांडग्यांचीं दिण्डी
चाले पण्ढरीची वाट !!! ॥१७॥
*****************
----- रविशंकर
८ ऑगस्ट २०००
आषाढांत बारावीची
निघे पालखी, पालखी
विद्यापीठांत शिराया
हवी चलाखी, चलाखी ! ॥१॥
सत्तरटक्के जहाल्या
जागा राखीव, राखीव
खर्या-खोट्या दाखल्यांचे
फुटे चोंहीकडे पेंव ! ॥२॥
थाटलीं शिकवण्यांचीं
ऐशी गुर्हाळे, गुर्हाळे
झाले असते पाहून
धन्य ज्ञानोबाचे डोळे ! ॥३॥
वारकरी तुम्ही-आम्ही
उक्त्या ज्ञानाचे, ज्ञानाचे
पोरें पुस्ताकांचे भारे
वाहतीं, मणामणाचे ! ॥४॥
मेंदूच्या अजीर्णांपायीं
भडभडून उलटी !
परीक्षेंत केल्यावर
कोरे डोके, कोरी पाटी !! ॥५॥
टाळांसंगे नाणियांच्या
वाजे नोटांचा मृदंग
भक्तिभावें आईबाप
झाले भजनांत दंग ॥६॥
गुणवत्तेसाठी चाले
मूक देंवाण-घेंवाण
पाठीमागील दाराला
नाही इच्छुकांची वाण !! ॥७॥
ऐनवेंळीं सराकार
काढी फतवा, फतवा !
वाढीव जागांचा तापे
पैसेवाल्यासाठीं तवा !! ॥८॥
जत्रेमाजी शारदेचा
भरे बाजार, बाजार
भाजून घ्यायला पोळी
संस्थाचालक तय्यार ! ॥९॥
उच्च न्यायालय मारी
प्रक्रियेस बूच, बूच
भर पावसात ठप्प
पालखीची आगेकूच !! ॥१०॥
हेवेदावें-आरोपांचा
उडे गोंधळ, गोंधळ
होळीआधी धूळवड
होते साजरी ओंगळ !! ॥११॥
न्याय-निवाडे होईतों
रंगे आखाडा रिंगण
स्वागताला 'श्री' च्या सज्ज
विद्यापीठांचे अंगण !! ॥१२॥
सर्वोच्च न्यायलयाचा
येतां निकाल, निकाल
पालखी हालें गजरीं
"हारी विठ्ठल विठ्ठल" !! ॥१३॥
दाटीवाटीच्या गाडीत
जागा मिळतां, मिळतां
कष्ट लागतीं सार्थकी
वाटे धन्य माय-तातां ! ॥१४॥
भक्तिरसांत लक्ष्मीच्या
बोला "श्रीरंग, श्रीरंग"
काय लावतील पाड
नामा-तुक्याचे अभंग? ॥१५॥
पोरा! गरीबां कुठलं
देव दर्शन, दर्शन?
लक्ष्मीसंगं गाभार्यात
नान्दतोय, नारायण !! ॥१६॥
पालखीला दर साली
गर्दी अफाट, अफाट !!
धनदांडग्यांचीं दिण्डी
चाले पण्ढरीची वाट !!! ॥१७॥
*****************
----- रविशंकर
८ ऑगस्ट २०००
No comments:
Post a Comment