दोनशे टक्के नफा काढून, दहा टक्कें सूट द्यावी
तुमच्या-आमच्या उद्योगांना,बारा महिनें बरकत यावी !
रोंख विक्री करावी,पण उधारीतच माल घ्यावा
उरल्या-सुरल्या खरकट्याचा,दसर्याआधीच 'सेल' लावा!
'एकावर एक मोफत,तिनावर चार आहेत' !
चिंता नको,उड्या घ्यायला,फुकटें ग्राहक तयार आहेत !!
"आज रोंख-उद्या उधार,काय हंवंय्? त्वरित मागा !
निवडताय् काय राव? वस्तूं घ्या न् चालूं लागा" !!
नवरात्राच्या पुढं-मागं, सामृद्धीची कांस धरा !
साखर-तेंल-गहूं-डाळीं, बाजारातनं गडप करा !!
सरकार वेंळीच जागं झालंय, असं कधी घडत नाही !
नाक मुठीत धरल्याशिवाय, तोंड कधी उघडत नाही !!!
' गुमास्त्याची ऐशी तैशी ', मजेत गाड्या-घोंडें उडवा !!
टक्केवारी घसरतीय्? विक्रीकर नी जकात बुडवा !!!
हिशेंबवह्यांत खुशाल लिहा, ' धंदापाणी घाट्यात आहे '
लक्षांत ठेंवा,' समृद्धीची किल्ली,आपल्या साठ्यांत आहे !!! '
डोंळे झांकून माल विका,सहा महिने हमी आहे !
' सेंवा फुकट-भाग विकत ',कल्पनाच नामी आहे !!
"विक्रीपश्चात् कसली सेंवा? मी तर दुकानवाला आहे !
’पावतीशिवाय खरेदी’ चा,चोंख व्यवहार झाला आहे" !!
उत्पादकांस धरून रहा, ग्राहक कांही गिळत नाही !
एकदां गळ्यांत पडलेला, माल बदलून मिळत नाही !
गांधीवादी तत्त्वांवर, विश्वास ठेंवून चालूं नकां !
'ग्राहक' नामें निर्वासितांस, मुळीच भीक घालूं नकां !!
चारीकडचं लोणी खावं, चंवकशीला कुणी नाही
दुर्मुखलेल्या ग्राहकला, उत्पादकही धनी नाही !
' दुसरा तक्रार करील तर बरं ', असली प्रजा आहे !!
ग्राहक देंव असला तरी, दुकानदारच राजा आहे !!!
दहा-पांच पिढ्यांपासून, आम्ही दुकानदारी केली
खादी आणी गांधी टोंपी, केव्हांच वनवासांत गेली !
देंशी माल विकून,काय कपाळ मिळतंय्? बोला बोला !!
खादी-बिदी नकां सांगूं ! ठंडा मतलब? कोका-कोला !!! "
*******************
---- रविशंकर.
९ मे २००२.

No comments:
Post a Comment