मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Sunday, July 24, 2016

॥ ’आय्‌. टी यन्‌’ ची ’चेंकावळी’ ॥






वृत्त: मोरोपन्तीं आर्या

कानांत डूल, तांठर केंस उभें, जीन फांटकी घाण
मळका अंगीं डगला, ’डी. ओ.’ फंव्वारि टांळुनी स्नान !
डोंळ्यास चाळिशीपरि चष्मा, उर्मट मुखांवरीं भाव
क्रेडीटकार्ड गुर्मित फंडकावी ’आय्‌. टी.’ तला राव !!

तोण्डीं च्युइंगम सदा चंघळत, चाले रवंथ बैलाची !
क्रीकेटच्या तिकीटासाठी, लावील रांग मैलाची !!
त्याला पंचे न पोळी-भाजी, प्रिय ’मॅक. डी.’ मधे चंरणे !
जाऊन ’पार्लर’ मधे, षठिषण्मासींच केंस विंचरणें !!

समजे ’स्मार्ट्‌’ स्वतःला, पण प्रत्यक्ष्यांत तो पढतमूर्ख !
बेदम चंगळवादी, अव्यवहारीपणातला अर्क !!
रुचतीं त्यास ’धडोतीं परदेशीं’, देशि वस्त्र किरकोळ !
मोजेल हजारांत, छापाचे ’पार्श्वभागिंच्या’, मोल !!





विद्यार्थिनी असो वा तरुणी, भांसे सिनेनट्याहि बर्‍या
थोंबाडिं टोंपल्यांच्या, वितवितभर लांब लोळतीं झिपर्‍या !!
भाळीं न, कुंकुमाचा पत्ता, उद्दाम बोलणें तुसडे
झिपर्‍या सदा झंटकतीं पांठीं, मानांस देउनी हिसडे !!

तें बोडकेच कर्ण, आभूषणहीन कंठ-पद-हात
करतील छानछोकित, ’ऐश्वर्या-कटरिना’ वरी मात !
विटकी जीन, टिंचभंरी झंपर, वितवीत खोटिचे जोडे !
नी ’टॉप-जीन’ मधले अंगप्रत्यंग, ठार ची उघडे !!

कानांत ठांसलेली ’मोबाईल’ ची बुचें सदा, दोन्हीं
चोंवीसतास चाळे बटणांशी, नाइके हाकां कोणी !!
’मल्टिप्लेक्स’ मधे, वा ’काव्हा कॅफे’ त, ’मॅकडी  दारीं’
’मॉल’ मधे, वा ’ब्यूटी पार्लर’ मुक्कामिं, धन्य हो स्वारी !!

गन्ध न गृहिणित्त्वाचा, स्वैपाकांतहि मुळी रुची नाही
"सो व्हॉट?" उत्तराविण उर्मट, कांनीं न आदळे कांही !!
आनन्द, बाबतीत शिकण्याच्या कांहिही, असे सारा
ऐशी कुणी वरावी, उर्मट मथ्थड नटीपरी दारा? !!

नवरा हंवा तयांना, ’अंबानी’, वा ’स्वदेश-अनिवासी’
’स्थायिक अमेरिकेतिल’, गेला बाजार, ’फक्त धनराशी’ !!
’आय. टी.’ तले, अखेरी वरतीं नवरे, ’भणंग नी भोट’
ते ’स्मार्ट’ जन्मजात, देण्यां-घेण्यांत ची घटस्फोट !!

’उर्मट’ वरी ’भणंगा’, ’नामी संसार’ काय तो तंरणे?
वर्षांत एकदोन, नशिबीं येतेच,’स्मार्ट अंतरणें’ !!
नाही क्षिती, न पर्वा, उत्तर सल्ल्यांस, फक्त, "सो व्हॉट?"
कुलवून एकमेकां, तत्त्पर लावायला दुजा पाट !!

न्यायालयींन फंरपट, जिरवी उडवायचा बटा माज
’ऐश्वर्याचा’, शमते ’सल्लूबाबा’चि ही पुरी खाज !!
खटल्यात त्या, यथेच्छ धिण्डवडे अब्रुचेहि निघतात !!
नी, सुन्न जन्मदाते, घेतात कपाळिं मारुनी हात !!!

’घाटावरचे धोबी’ ’घरचे’ ना ’दारचे’, निघे अर्थ
’घाटावरी’ च ’टेकी’ आजन्मच नांदतीं, ’खरे स्मार्ट’ !!! 
झाले कि लग्न यांचे, संसारहि नीटनेटके, थोडे !!!
मातापित्यांस  धन्य  वाटे, ’गंगेत नाहले घोडे’ !!!!

वाटें तयास जन्म ’भारत’ देशातला, पुरा व्यर्थ !
शोंधी, येथ विदेशी नक्कल करुनी, जगायचा अर्थ !!
’रुपया’ मिळो कितीही येथे, ’डॉलर’ चि ना शमे हांव !
,"देवा ’यू. एस्‌. ए.’ च्या, लागो तीरास आमुची नाव" !!

धंदा नुरे आम्हांला, दुसरा कांही विदेशगमनांतीं
हाणून रोज ' सेल्फी ', बसणे चंढवीत ' फेसबुक ' वरती !!
मिळतां छब्यांस, कद्रू गणगोतांतून, वाहवा दोन
' लाईक्स् ' गांठवांया, सुहृदांना ' आय. टी. ' करी फोन !!!

हातीं ' जिलेट '  असुनी, ' ते ' वाढवितात दाढिचे खुण्ट
ओंढीत री तयांची, दाढ्या कुरवाळती इथे मठ्ठ !!
' ते ' भक्षितात ' पिझ्झा-बर्गर ', जे येथ ' आय. टी. ' हादडी
' ते ' 'बर्म्युडा ' त फिरतीं, म्हणुनी अर्धीच आमुची चड्डी !!!

जिरते न ही असूया, कांही केले तरी उलट भंडके
नी मानसोपचारतज्ञाच्या दारिं, ’आय्‌. टी.’ धंडके !!!
’असुनी अडचण’ असली रत्ने गांळीव धाड, बिनडोंक
देवा अमेरिकेला, होतिल इथले तरी सुखी लोक. !!!!!

वृत्त: शार्दूलविक्रिडीत:

नाना उवाच:

,"जे जे थेर भिकारलक्षणिं, समुद्रापार देशीं निघे !
तें तें तत्क्षणिं येथ ’आय्‌. टि.’ तल्या निर्बुद्ध डोंकीं रिघे. !!
नाचे कोणि अमेरिकेत, सदरा फांडून, भोगीश्वर !!! 
सार्‍या ’ भारत भू’ त नाचति, विजारी फेंडूनी वानर. !!!!

*************************************
----- रविशंकर.
१९ मे १९८९. 

No comments:

Post a Comment