मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Saturday, December 13, 2008


॥ साहेब ॥



(गझल)/(व्यंगोक्ति)

यांच्यासमोर तांठ, राहूं नये कण्यानें
साधेल सर्व कांहीं, निर्लज्ज वांकण्यानें

रे क्षुद्र कर्मचार्‍या!, निष्ठा करी बटीक
यांची, मिळेल बढती, यांच्याच शिंकण्यानें ! 

लाजूं नको, भरंवसा, यांच्यावरीच ठेंव
होईल जाड कात, यांच्याच ठोंकण्यानें

होंऊ नकोस गोरा-मोरा जनीं असा तूं
ये तेंज ओंजळीला, यांच्याच थुंकण्यानें ! 

हरपेल देहभान, होईल तांठ मान
वारे पितील कान, यांच्याच फुंकण्यानें

आले कितीक, आणि गेले, किती महात्मे
होती अचाट कार्यें, यांच्याच भुंकण्यानें !! 

ही चांकरीतली, घे समजून नीट मख्खी
निवृत्त होईतोंवर, 'होय जी' घोंकण्यानें

साहेब एक दिवशी होंशील तूं हि वेड्या
धंद्यातलें, सदैव अद्‍न्यान झांकण्याने !!! 

***************
----- रविशंकर

१७ नोव्हेंबर १९९८

No comments:

Post a Comment