॥ माझी कविता ॥
वृत्त: ओंवी
चंवळीच्या शेंगेपरी | माझी कविता असावी
पाहतांक्षणीं रेखीव | छबी, मनांत ठंसावी || ॥१॥
शब्द-शब्द वास्तवाच्या | प्रचीतीनं ओथंबावा
ध्रुवपद येतां कानीं | गुणग्राहक थांबावा || ॥२॥
ओंळ-ओंळ तालावर | वृत्तछंदाच्या, नाचावी
मर्मवेंड्या वाचकानं | अधाश्यापरी वाचावी || ॥३॥
नखशिखांत कन्यका | अलंकारांनीं सजावी
लुब्ध प्रतिभावन्तांनी | तिची धाटणी पुजावी || ॥४॥
माझ्या कवितेचा प्राण | तालांसुरांत नहावा
शब्द विसरले तरी | अर्थ चिरंजीव व्हावा || ॥५॥
माझ्या कवितेंत पीळ | मनाचा, उलगडावा
गुणगुणत तीवर | जीव रसिक जडावा !! ॥६॥
*******************
----- श्रीमति सुधाशंकर
२३ मार्च २००२.

No comments:
Post a Comment