मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Thursday, October 30, 2008


॥ अभिप्राय ॥


" हे मतप्रदर्शन माझे, पहिले वहिले
फुगवितां न वास्तव, जे वाटे, ते लिहिले
ऐकला, खर्‍या अनुभूतीचा हुंकार
आनंद, मनाला झाला, अपरंपार
शारदा, तुम्हाला कृपादृष्टिने पाहों
ज्योती सृजनाची, अखण्ड तेंवत राहों
लेखन, तुमच्या हांतून, असेंच घडावें
भरभरून मन, शब्दांतुन ओंसंडावें" !!!

***********
----- रविशंकर।
३० ‍ऑक्टोबर २००८

No comments:

Post a Comment