॥ पर्यावरण ॥
(व्यंगोक्ति)
"पिण्याला तांबडे पाणी, हवा दूषीत वादळी
कसें वाटेल घेतांना, जाळता श्वास काजळी ?
'पडे ना श्रावणीं वर्षा', शिरा तांणून ओंरडा
सदा दुष्काळ पुजलेला, प्रश्न 'ओंला कि कोंरडा' ?
सुगीला खायचें काय?, शिवारें पार वाळलीं
कुणी सत्ताधरांपैकी, टिपें आहेत गाळलीं ?
करावें सांडपाण्यानें, नद्यानालेहि जांभळे
कशी येतील, वृक्षाला विषाच्या, चांगलीं फळें ?
हव्या हिंडायला गाड्या, धुराचे लोंट सोंडित
करावी आडवी झाडें, मुळांपासून तोडित
करा रस्ते दुतर्फा रुंद, उच्चाटून जंगलें
जाळण्यां लाकडें न्यावी, कुणीही तोंडुनी भलें
विषारी वायुगळतीनें, माणसें लाख मारली
कुणी ही स्वीयकरणीची कडू, खावीत कारली?
"नको कां रुंद रस्ते?, काय ही बेशिस्त वाहने !
पुढे जाणे पडे भाग घुसूनी, याच कारणें !!
असे हे मान्य आम्हांला, करावा सक्त कायदा
'दुज्यांनीं पाळला तर तो, मला हो काय फायदा' ?
करा खुश्श्याल दातांच्या, सांगुनी सांगुनी, कण्या
जन्मतां हक्क आम्हाला मिळे, रस्त्यांत थुंकण्यां" !!
आमच्या रोंमरोंमांत, व्यक्तिस्वात्र्यंतची वसें
कुठेही ढीग कचर्याचे, मुभा टाकायची असे
कधी पर्यावरणरक्षाकृतीचे, सूप वाजले
म्हणावे फक्त खेंदाने," प्रदूषण फार माजले "
करावे काय इतरांनीं, जमे आम्हांस सांगणे
पुसूनी पार्श्वभागीं हात, निजमार्गास लागणे !!
जगाल, दोस्त हो, जर कां, सृष्टिला ओंरबाडुन
कुणां ठाऊक दैवात, ठेंवलें काय वाढुन?
तुम्हां-आम्हांस साधेनाच, अंतर्बाह्य जागणे
हवें पर्यावरण स्वच्छ?, सुधारा फक्त वागणे" !!!
************
----- रविशंकर.
२८ ऑगस्ट २००२.

No comments:
Post a Comment