|| लिव्ह इन सेकंड इनिंग ||
वैधुर्याला [ / वैधव्याला ] ठाउक नव्हते
घंडायची होती तंव भेंट
नेहा भिडतां , अलगद शिरलो
डोळ्यांतुन काळजांत , थेट || १ ||
क्षणात एका , ' सप्तदशी ' ने
कशी टांकली न कळे , कात
ओंळख , स्वारस्यांत बदलली
रंग जगाला चंढले सात || २ ||
साध्या-साध्या संवादांतुन
ऐकूं आले गुणगुणणे
' उर्वरीत ' बोलल्याविणेही
तुझे मला कळले म्हणणे || ३ ||
सहवासाची शाल मखमली
रुसव्या-फुगव्यांनी विणणे
बेलबुट्टि भंरतांना , नाही
हौस तुझी-माझी शिणणे || ४ ||
वर विधि चा , ' नरजन्म ' असे हा
आंकळतां हें , लवलाही
रडत-कुढत , उर्वरीत जीवन
जगायचे कारण नाही || ५ ||
गेलेले परतणार नाहित
कठोर वास्तव स्वीकारूं
उणीव पहिल्या ' अर्धांगां ' ची
डावात दुज्या पुरी करूं || ६ ||
वाजवितां येतोच दुतोंडी
जनापवादांचा ढोल
संकटकाळीं साद घालितां
कोण धांवते ? तें बोल || ७ ||
पोरें-बाळें ही गुरफटलीं
ज्यांच्या-त्यांच्या संसारीं
एकटेपणाची ही भंयकर
जाणीव च , काळीज चिरी || ८ ||
तरी न खंचतां , अनमोल असे
उरले-सुरले दिवस जगूं
तिन्हीसांजही आयुष्याची
रसिकपणाने उपभोगूं || ९ ||
तन-मन-धन वेचूं दोघेही
उगीच हात न आंखडतां
परस्परांसाठी च झिजावे
गरज न घेण्याची शपथा || १० ||
म्हणोत कोणी ' म्हातारचळी '
म्हणोत ' वेडे ' कुणी , खुशाल
आंतरीक ओढिची , भंरजरी
मिरवूं ही , अंगावर शाल || ११ ||
**********************************
-- रविशंकर.
२७ जानेवारी २०२६
No comments:
Post a Comment