मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Friday, December 11, 2015

॥ इण्डिया शायनिंग्‌ ॥


दारू ढोंसून गाडी हांकणं
' सल्लू ' चा अधिकार आहे
माझ्या देशीं,रोख विक्री स
न्याय देवता तयार आहे              ॥१॥

सदोष साक्षीपुराव्यांना
लाख-कोटीं चा भाव आहे
चिरडलेल्या अभाग्यां ना
ना नांव ना गांव आहे                  ॥२॥

डी. जे. लावून नाचणार्‍यांचा
' भाईजान ' ला आधार आहे
त्यांतलं कोण कोण, गाडीखाली
चिरडून घ्यायला तयार आहे?       ॥३॥

इथल्या कोडग्या जनतेचा
गुन्हेगार च हीरो आहे
' इंडिया शायनिंग्‌ ' हाच एक
भलामोठ्ठा झीरो आहे !!!               ॥४॥

*********************************
-- रविशंकर.
१० जानेवारी २०१५. 

No comments:

Post a Comment