॥ मी आहे ॥
(गझल)
"आलो कुठून?, कोंठे जाणे जरूर आहे ?
शोंधांत या, तसा मी आजन्म चूर आहे
जाणीन मार्ग केंव्हां, माझें मला न ठावें
ग्रन्थांत, फक्त उपदेशांचाच पूर आहे ! ॥१॥
मोठेपणा फुकाचा घेंऊन, भोंवर्यांत
मारायला उडी, मी आरंभशूर आहे !
खाल्ल्या गटांगळ्या कीं, कळतें मला सदैव
गांठायचा किनारा, बिल्कूल दूर आहे ! ॥२॥
कळतीं मलाहि छक्केपंजे, म्हणून आतां
मी चार हांत, सोंद्यांपासून दूर आहे !
गाऊं नकां कुणाची, कोणी, करूणगाथा
’उडत्याचि’ मोजण्यांत मी ही चतूर आहे. !! ॥३॥
तुम्ही वृथाच केंल्या कां, साळसूद पृच्छा?
लागूं न मी दिलेली, ताकांस तूर आहे !
चुगल्या करावयाच्या आधी, करा विचार
मी अश्वतंगडीचा मागील, खूर आहे !! ॥४॥
आनन्द जाहला की, फुलवून मी पिसारा
बेभान नाचणारा, बांका मयूर आहे !
कुत्सीत माणसानों, डिवचूं नकां उगांच
मस्तीत पेंगणारा, मी व्याघ्र क्रूर आहे !! ॥५॥
केंल्यांत ना, मनानें मोठ्या, चुका कबूल ?
विसरायला, खिलाडू मी ही, जरूर आहे !
लंगोटियारि केंली की, रौद्र वादळांशी
झुंजावयास, निधडा खंबीर ऊर आहे !! ॥६॥
ओंवाळण्यांस जीव, नाही घिसाडघाई
दोस्ती मुरेपर्यंत, मजला सबूर आहे !!
काढून बी कठीण, स्नेहांसवेंच चाखा
मिठ्ठास मी चवीचा, अरबी खजूर आहे !! ॥७॥
माझाच, न्याय-सत्यासाठी करून होंम
अग्नीत शुद्ध झांलेला, मी च धूर आहे !
वेंळूंत पंचप्राण ओंतून, फुंक मारा
बेधुन्द भैरवीचा, मी आद्य सूर आहे !! ॥८॥
**************
----- रविशंकर.
४ जानेवारी १९९८
(गझल)
"आलो कुठून?, कोंठे जाणे जरूर आहे ?
शोंधांत या, तसा मी आजन्म चूर आहे
जाणीन मार्ग केंव्हां, माझें मला न ठावें
ग्रन्थांत, फक्त उपदेशांचाच पूर आहे ! ॥१॥
मोठेपणा फुकाचा घेंऊन, भोंवर्यांत
मारायला उडी, मी आरंभशूर आहे !
खाल्ल्या गटांगळ्या कीं, कळतें मला सदैव
गांठायचा किनारा, बिल्कूल दूर आहे ! ॥२॥
कळतीं मलाहि छक्केपंजे, म्हणून आतां
मी चार हांत, सोंद्यांपासून दूर आहे !
गाऊं नकां कुणाची, कोणी, करूणगाथा
’उडत्याचि’ मोजण्यांत मी ही चतूर आहे. !! ॥३॥
तुम्ही वृथाच केंल्या कां, साळसूद पृच्छा?
लागूं न मी दिलेली, ताकांस तूर आहे !
चुगल्या करावयाच्या आधी, करा विचार
मी अश्वतंगडीचा मागील, खूर आहे !! ॥४॥
आनन्द जाहला की, फुलवून मी पिसारा
बेभान नाचणारा, बांका मयूर आहे !
कुत्सीत माणसानों, डिवचूं नकां उगांच
मस्तीत पेंगणारा, मी व्याघ्र क्रूर आहे !! ॥५॥
केंल्यांत ना, मनानें मोठ्या, चुका कबूल ?
विसरायला, खिलाडू मी ही, जरूर आहे !
लंगोटियारि केंली की, रौद्र वादळांशी
झुंजावयास, निधडा खंबीर ऊर आहे !! ॥६॥
ओंवाळण्यांस जीव, नाही घिसाडघाई
दोस्ती मुरेपर्यंत, मजला सबूर आहे !!
काढून बी कठीण, स्नेहांसवेंच चाखा
मिठ्ठास मी चवीचा, अरबी खजूर आहे !! ॥७॥
माझाच, न्याय-सत्यासाठी करून होंम
अग्नीत शुद्ध झांलेला, मी च धूर आहे !
वेंळूंत पंचप्राण ओंतून, फुंक मारा
बेधुन्द भैरवीचा, मी आद्य सूर आहे !! ॥८॥
**************
----- रविशंकर.
४ जानेवारी १९९८
No comments:
Post a Comment