|| हे अंब ||
वृत्त
: ओंवी
सत्तरी जाहली पार | नुरली कसली भूक
दिसूं लागे पैलतीर | आतां अंधूक अंधूक || १ ||
माथ्यावर कर तुझा | वरद, सदा राहीला
चरणीं
तुझ्या, अवघा
| जन्म
वाहीला वाहीला || २ ||
असशील पैलतीरीं | वाट पाहत, झुरून
चालवशील ना माझं | बोंट धंरून धंरून ? || ३ ||
पसरल्या संध्याछाया | कांतर वेळेला, दारीं
याच वेळीं येते ना गं | तुझी अंबारी अंबारी ? || ४ ||
पेलवेना झाली जर | आरती ओंवाळायला
येऊं अंगां-खांद्यांवर | खेंळायला खेंळायला ? || ५ ||
' कडेवरी घे ' म्हणून | नाही रडणार मुळी
निजायला मांडी तुझी | मखमली मखमली !! || ६ ||
तें च सिंहासन माझं | अढळपद, हे अंब
ओंठीं गायत्री अखंड | जगदंब जगदंब !!! || ७ ||
***************************************************
-- रविशंकर.
११ जुलै २०२२.
No comments:
Post a Comment