|| नमो आदिमाया ||
चाल – प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा
जिवा ची शिवाशी भेंट घंडवाया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || धृ ||
आत्मशुध्दते ची तुला अपूर्वाई
राव-रंकांमाजीं पक्षपात नाही
सुरासुर, रांगा लावितीं भंजाया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || १ ||
न्याय-तराजू चा, कांटेंकोंर तोल
तुझ्या दरबारीं, कधीं ना ढंळेल
कर्मदूषितां ना, नसे दया माया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || २ ||
तुझी उपासना, करी कर्मशुध्दि
मति - मना ला ना, शिवे क्षुद्रबुध्दि
खड्गधार, वाणीस लागे चंढाया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || ३ ||
कायदा तुझा गे, आंसूड कठोर
वाहुनी न नेणें, कडेवरी पोर
रणीं, घांव झेलीत लागे घंडाया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || ४ ||
गायत्री-सादे ने , झणी धांव घेशी
स्वत्त्व-तेज-शौर्य-अस्त्र-शस्त्र देशी
स्वतः,धर्मयुध्द स्वतःचें, लढाया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || ५ ||
सिध्दता जयांची, उतरण्यां रणांत
पांठिशी तयांच्या, तुझा वरद हात
नियतीस ही, त्यांपुढें वांकवाया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || ६ ||
तथाSस्तु तुझा गे, देई सर्वकांही
कामना अतृप्त, कोठली न राही
वाटते, मिळावे तदंकीं निजाया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || ७ ||
मागणे न कांही, तुझ्याकडे, आतां
चरणीं तुझ्याची, टेंकवून माथा
मस्तकीं असूं दे , तुझी छत्रछाया
नमो आदि अंबे, नमो आदिमाया || ८ ||
श्रीजगदंबाSर्पणमस्तु II
*****************************
-- रविशंकर.
२६ सप्टेंबर २०२६.

