|| सेकण्ड इनिंग ||
,“ हाउ आर यू डुइंग ? ”
मी सांगते, “ आत्तां कुठं
सुरूं झालीय ' सेकण्ड इनिंग ' " || १ ||
पोरांनां च टारायला
घेतला कोरा फोन ' ऍपल् '
हंळू च कांढून बघितलं
पहिलं ' सेल्फी ' चं सॅंपल !! || २ ||
' मारुती ' च्या बॅकग्राउण्डवर
‘ सेल्फी ' तली ' हीरॉईन '
आयला !!... काय चंमकत होती
‘ ऍश् ‘ वाटेल मोलकरीण !! || ३ ||
असतील-नसतील त्या सगळ्यांना
टिचक्या मारून ' फॉरवर्ड् ' केला
एकूण एक जाणकार
‘ उलटा अंगठा ' दांखवून गेला !! || ४ ||
तेव्हां च खंरी सुरूं झाली
रंगारंग ' सेकण्ड इनिंग '
रोज पन्नास ' सेल्फी ', अन्
दीड-दोनशे ' गुड् मॉर्निंग् ' !!! || ५ ||
तास न् तास ' ऍपल् ' बघून
डोळे लागलेत सुकायला
‘ फॉरवर्ड् ' च्या टिचक्या मारून
बोटं लागलीत दुखायला !! || ६ ||
मैत्रिणी-पोरं-बाळं
कुणीच ' फॉरवर्डस् ' बघत नाहीत
पहिल्यासारखे ' सेल्फी ' ,आतां
कांही केल्या निघत नाहीत !! || ७ ||
हल्ली नवराही, फारसा
लागत नाही नादाला
प्रेमळ हांक मारली, तरी
तोंड फुटतंय् वादाला !!! || ८ ||
‘ ऍपल् ' वाया गेल्याचं
दुःख मनीं दाटत नाही
माझ्यासारखा ' फॉरवर्डस् ' चा
' प्रसाद ' कुणी च वाटत नाही !! || ९ ||
तरीही मी अंतर्यामीं
कांहीशी अस्वस्थ आहे
‘ सेल्फी ' तल्या ' ऍश् ' ची गुर्मी
पुरती अत्यवस्थ आहे !! ||१0 ||
नको झालाय ' गोपाळकाला '
जिवाचे होताहेत हाल
' व्हॉट्सॅप-फेसबुक्-ट्वीटर ' चं
परमेश्वरा,
श्राध्द
घाल !!! || ११ ||
झाली गायब, मुलायम
दुधावरची
' पहिली साय '
‘ ऍडम-ईव्ह ' नं खाल्लेलं
‘ ऍपल् ' , हें च होतं काय ? || १२ ||
-- रविशंकर.
१ नोव्हेंबर २०२३.
No comments:
Post a Comment