मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Thursday, August 22, 2013

॥ क्लिक्‌ ॥

॥ क्लिक्‌ ॥



’क्लिक्‌ क्लिक्’

’जॉइन्‌’ करा
’क्लिक्‌ क्लिक्’
’साइन्‌’ करा

’क्लिक्‌ क्लिक्’

लई भारी
’क्लिक्‌ क्लिक्’ ची
’किक्‌’ न्यारी !

’क्लिक्’ शिवाय

काय होतंय्‌?
’क्लिक्‌ क्लिक्’
सगळं येतंय्‌ !

’क्लिक्‌ क्लिक्’

’कोड’ भरा
’क्लिक्‌ क्लिक्’
’अप्‌लोड’ करा

’क्लिक्‌ क्लिक्’

माहिती काढा
’क्लिक्‌ क्लिक्’
पडदा फाडा !

’क्लिक्‌ क्लिक्’

विकत घ्या
’क्लिक्‌ क्लिक्’
फुकट द्या 

’क्लिक्‌ क्लिक्’

म्हणा पाढा
’क्लिक्‌ क्लिक्’
चित्रं काढा 

’क्लिक्‌ क्लिक्’

व्यायाम करा
’क्लिक्‌ क्लिक्’
झोंपा जरा ! 

’क्लिक्‌ क्लिक्’

तिकीट काढा
’क्लिक्‌ क्लिक्’
’पिझ्झा’ वाढा 

’क्लिक्‌ क्लिक्’

संदेश पाठवा
’क्लिक्‌ क्लिक्’
औषध चाटवा

’क्लिक्‌ क्लिक्’

वजन घटवा
’क्लिक्‌ क्लिक्’
' स्थळं ' पटवा ! 

’क्लिक्‌ क्लिक्’

’चॅट्‌ करा
’क्लिक्‌ क्लिक्’
टॅक्स्‌ भरा

’क्लिक्‌ क्लिक्’

पैसा कमवा
’क्लिक्‌ क्लिक्’
लग्नं जमवा !

’क्लिक्‌ क्लिक्’

अक्षत वाटा
’क्लिक्‌ क्लिक्’
दुकान थाटा

’क्लिक्‌ क्लिक्’

गल्ला गोळा 
’क्लिक्‌ क्लिक्’
मजेत  लोळा !

’क्लिक्‌ क्लिक्’

मित्र जोडा
’क्लिक्‌ क्लिक्’
नाती तोडा !

’क्लिक्‌ क्लिक्’

भंडाफोड
’क्लिक्‌ क्लिक्’
काडीमोड !!

’क्लिक्‌ क्लिक्’

मजा आली
’क्लिक्‌ क्लिक्’
चंगळ झाली !

’क्लिक्‌ क्लिक्’

करतां करतां
’इंटरनेट’ वर
अक्कल गेली !!

’क्लिक्‌ क्लिक्’

थांबा जरा
’क्लिक्‌ क्लिक्’
विचार करा 

’लॉग्‌ इन्‌’ आधी करायची

एकच ’क्लिक्‌’
सुटली आहे !!

’क्लिक्’ करून

सुखी व्हायची
’वेब्‌लिंक्’ 
कुठली आहे ?

**************** 


----- रविशंकर.

२२ ऑगस्ट २०१३.




No comments:

Post a Comment